चोरीच्या संशयावरून ग्रामीण पोलिसांची कारवाई – ६ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन जप्त

नांदेड: ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करत चोरीच्या संशयावरून ६ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन जप्त केली आहेत. या प्रकरणी काही संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईचा तपशील
गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करून काही संशयित वाहनांची तपासणी केली असता ती चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी गुन्हे दाखल केले
-
संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अधिक चौकशी केली जात आहे.
-
जप्त करण्यात आलेल्या वाहनांची मूळ मालकांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
-
या वाहनचोरी प्रकरणाचा मोठा रॅकेट असण्याची शक्यता असल्याने पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
पोलीस प्रशासनाचा इशारा
नागरिकांनी आपल्या वाहनांची योग्य काळजी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी पार्किंग करताना सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे.
आरोपी 1) करणसिंघ किशनसिंघ बावरी वय 34 वर्ष, 2) आकाशसिघ करणसिंघ बाबरी वय 29 वर्ष, 3) बलजितसिंघ बबनसिंध बावरी वय 48 वर्ष, सर्व रा. जुनाकोठा ता.जि. नांदेड, जप्त मुद्देमाल 6 दुचाकी मोटार सायकल व एक चारचाकी वाहन असा एकुण किमंती 17,74,300/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी ऑपेशन फ्लश आउट अंतर्गत दिनांक 03/04/2025 रोजी 04.00 ते 08.00 वाजेच्या दरम्यान कोबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश मान्टे, सपोनि सचिन गडवे, पोउपनि भोसले, गायकवाड, चव्हाण, व पोलीस अंमलदार असे मिळून पो. स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीत संत
गाडगे महाराज सोसायटी जुनाकोठा येथे छापा मारुन वर नमूद आरोपीतांनी त्यांचे जवळ असलेल्या मोटार सायकलचे व चारचाकी वाहने बेकायदेशीर पणे वापर करीत असताना मिळून आले त्यांना वाहणाचे कागदपत्राबाबत विचारपुस करता त्यांनी कोणतेही बाहानाचे कागदपत्र दाखविले नाही, सदर वाहाणे चोरीचे असल्याचा संशय आल्याने वरील आरोपीकडुन 06 दुचाकी मोटार सायकल व ०। चारचाकी वाहन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे आरोपीबर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. वरील आरोपीकडून 6 दुचाकी मोटार सायकल व एक चारचाकी वाहन असा एकुण किमंती 17,74,300/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगौरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.



