अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहने आणि फटाका बुलेटवर कडक कारवाई

शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांची अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन परवाना चालणारी वाहने व फटाका बुलेट यांचेवरती धडक कारवाई करून 3,85,200 /- रूपयाचा दंड आकारण्यात आला..
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी शहरात वाढत असलेली ट्राफिक समस्या अटोक्यात आणनेसाठी शहरात चालणारी अवैध प्रवाशी वाहतूक तसेच विना परवाना / परमिट चालणारे वाहणे, भरधाव वेगाने चालणारी वाहने, फटाका बुलेट व फळांचे गाडयाचे रस्त्यावरील अतिक्रमण यांचेवरती कार्यवाही करण्याची मोहीम राबविणे बाबत शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांना आदेशीत केले होते
त्या अनुषंगाने दिनांक 02.04.2025 रोजी प्रभारी अधिकारी श्री साहेबराव गुट्टे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, वजिराबाद यांनी सिटीबी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांचे समवेत रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट व कलामंदिर येथील वाहतूकीस अडथळा निर्माण होणारे अवैध अतिक्रमण करणा-यांवर व वाहनावर दंडात्मक कार्यवाही करून 1) पेड केसेस 53 = 29,900 रूपयाचा दंड 2) ऑनलाईन युपीआयव्दारे केसेस 21 13,600 रूपयाचा दंड 3) अनपेड केसेस 146 = 2,15,000 रूपयाचा दंड, 4) ट्रिपल सिटच्या 16 केसेस 16,000 रूपयाचा दंड 5) फटाका बुलेटवर 06 केसेस 6000 रूपयाचा दंड अशा एकूण 242 केसेस करून 2,80,200 /- रूपयाचा दंड आकारण्यात आला.
तसेच दिनांक 02.04.2025 रोजी प्रभारी अधिकारी श्री जगन्नाथ पवार, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, इतवारा यांनी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांचे समवेत देगलूर नाका, जुना मोंढा व ढवळे कॉर्नर या ठिकाणी वाहणाची कागदपत्रे तपासणी केली दरम्यान कागदपत्र नसल्यामुळे 08 ऑटोवर कारवाई करून त्यापैकी 04 ऑटो जमा करण्यात आले. सोबतच ऑटो चालकांना गणवेश परिधान करणेबाबत सुचना दिल्या. जुना मोंढा येथील वाहतूकीस अडथळा निर्माण होणारे फळांच्या गाडयांवर कार्यवाही करण्यात आली. तसेच फटाका बुलेट शोध मोहिम, अवैध प्रवाशी वाहतूक व इतर केसेस अशा एकुण 65 केसेस करून एकुण 1,05,000/- रूपयाचा दंड आकारण्यात आला.
शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी नांदेड शहरात मोहीम राबवुन फटाका बुलेट, अवैध प्रवाशी वाहतूक, वाहतुकीस अडथळा करणारे फळांच्या गाड्यावर, विना परवाना / परमिट चालणारे वाहणे, भरधाव वेगाने चालणारी वाहने यांचेवर एकत्रीत कार्यवाही करून एकुण 3,85,200/- दंड आकारण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली अधीकारी/ अंमलदार शहर वाहतूक शाखा वजिराबाद, इतवारा, दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.



