जिला
नांदेडचे बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर रद्द – कोठा मैदानात सेवा अभावामुळे निर्णयात बदल

नांदेड, १२ एप्रिल २०२५ : नांदेड शहरातील मुख्य एस.टी. बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर कोठा मैदान येथे करण्याचा निर्णय एमएसआरटीसीने घेतला होता. मात्र, कोठा मैदान येथे आवश्यक पायाभूत सुविधा व सेवांचा अभाव असल्यामुळे हे स्थलांतर रद्द करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी कोठा मैदानात बस स्थानक स्थलांतरित करणे प्रस्तावित होते. परंतु, त्या ठिकाणी वीज, पाणी, बस थांबे, तिकिट बुकिंग काऊंटर आदी सुविधांची कमतरता लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
त्यानुसार, नांदेडचे एस.टी. बस स्थानक नेहमीच्या ठिकाणीच सुरू राहणार आहे, असे एमएसआरटीसीने स्पष्ट केले असून, नागरिकांनी कोणतीही संभ्रमाची स्थिती ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.



