नांदेड ते आदिलाबाद रेल्वेमार्गावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचा तपासणी दौरा

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) श्री. प्रदीप कामले यांनी आज 12 एप्रिल 2025 रोजी नांदेड विभागातील नांदेड ते आदिलाबाद रेल्वेमार्गांवर तपासणी दौरा केला. या दौऱ्यात विविध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला आणि भविष्यातील सुरक्षा व कार्यक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
नांदेड ते आदिलाबाद दरम्यान रेल्वेमार्गावर तपासणी खिडकीतून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशा विविध संरचना, वळणे, ब्रिजेस व सिग्नल यांची बारकाईने पाहणी करण्यात आली. मुदखेड, किनवट आणि आदिलाबाद रेल्वे स्थानकांचा विकास अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्यांना सूचना केल्या.
मुदखेड ते बिम्बारी दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 01 , थेरबन जवळील लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 04 च्या जागी भुयारी पूल आणि धानोरा ते बोधडी बुजरुग दरम्यान पूल क्र. 110 आणि वळण क्र. 36 आशा संरचनांची तपासणी करून त्यांची सध्याची स्थिती आणि देखभाल कार्यांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
श्री प्रदीप कामले यांनी मुदखेड स्टेशन यार्डातील पॉइंट्स आणि क्रॉसिंग्स आणि स्विच एक्सपान्शन जॉइंट्सची पाहणी केली, स्टॉक रेल जॉइंट व ग्लूड जॉईट संबंधित यार्ड विभागांची तपासणी करण्यात आली.
श्री प्रदीप कामले यांनी किनवट स्टेशन ची पाहणी केली . यात त्यांनी टावर कार शेड, बांधकाम सुरु असलेले किनवट आर.पी.एफ. बारेक, फुट ओवर ब्रिज आणि व्ही.आई.पी. लावूंज ची तपासणी केली.
या नंतर श्री प्रदीप कामळे यांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकाची तपासणी केली. यात त्यांनी स्टेशन मास्तर कार्यालयाची तपासणी केली आणि आदिलाबाद पीटलाईन ची पाहणी केली. आदिलाबाद रेल्वे स्थानकावरील क्रू लॉबी, रंनिंग रूम यांची तपासणी केली. तसेच आदिलाबाद येथील रेल्वे हेल्थ युनिट ला भेट दिली.
श्री गोदाम नागेश, माननीय खासदार / आदिलाबाद आणि श्री पायाल शंकर, माननीय आमदार / आदिलाबाद यांनी श्री प्रदीप कामले यांची आदिलाबाद रेल्वे स्थानकावर भेट घेतली आणि विविध रेल्वे विषयांवर चर्चा केली. तसेच विभागीय सल्लागार समिती सदस्यांनी हि श्री कामले यांची आदिलाबाद रेल्वे स्थानकावर भेट घेतली.
या दौऱ्यात श्री पी. सी. रुद्र मूर्ति वरिष्ठ विभागीय अभियंता, श्री पी. सुरेश, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि टेलिकॉम अभियंता, श्री हरी कृष्ण वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, श्री निमजे, उप मुख्य अभियंता/गतीशक्ती /नांदेड, श्री परम मित्र, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता, श्री कुमार गौरव वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर, , श्री ए. रवी तेजा वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता, श्री रवी , विभागीय अभियंता, श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य अधिकारी, श्री श्रीनिवास राव, सहायक विद्युत अभियंता, या हे विभागीय अधिकारी श्री प्रदीप कामले यांच्यासोबत उपस्थित होते.



