क्राईम

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई, ५० लाखांहून अधिक किमतीची अवैध रेती वाहतूक पकडली

 

नांदेड, १४ एप्रिल २०२५ – नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत मोठी कारवाई करत विनापरवाना रेती वाहतूक करणारी एक हायवा जप्त केली आहे. या कारवाईत अंदाजे ०४ ब्रास रेतीसह ५० लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई नांदेड-लोहा रस्त्यावरील वाडीपाटी परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने ही धडक कारवाई केली.

आरोपीं माधव शिवाजी बकाल (वय २४ वर्षे), रा. रहाटी, ता. पूर्णा, जि. परभणी
दत्तराम गोविंदराव शिंदे (वय ४३ वर्षे), रा. डेरला, ता. लोहा, जि. नांदेड

जप्त विना क्रमांकाची हायवा गाडी अंदाजे ०४ ब्रास अवैध रेती (गौण खनिज) एकूण किंमत: ₹५०,१६,०००/-

ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर (पोस्टे नांदेड ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उपनि. बाबुराव चव्हाण, पोहेकॉ मोरे, पोकॉ भिसे, पोकॉ कलंदर, पोकॉ माळगे, आणि पोकॉ सिरमलवार या पोलिसांच्या पथकाने केली.

मार्गदर्शन: अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा

या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले असून, अवैध रेती वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेस या कारवाईमुळे बळ मिळाले आहे. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारात सामील असलेल्या अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *