क्राईम

नांदेडमधील शिवाजीनगर परिसरात खून; एकाचा मृत्यू, दोन जखमी चार अनोळखी हल्लेखोर पसार

नांदेड, 14 एप्रिल 2025: शहरातील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जोशी हॉस्पिटलच्या मागील रेल्वे ट्रॅकजवळ वाडिया फॅक्टरीजवळ झालेल्या या हल्ल्यात राहुल विनोद दिपके (वय २२, रा. हस्सापुर टेकडी) याचा खून करण्यात आला असून, त्याचा चुलत भाऊ हर्ष दिपके गंभीर जखमी झाला आहे.

घटना कशी घडली?
फिर्यादी सचिन जनार्धन हटकर (वय २७, रा. वाडी मुक्त्यारपूर, ता. मुदखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल, हर्ष आणि फिर्यादी हे तिघं हस्सापुरकडे जात असताना, चार अनोळखी इसम मागून येत शिवीगाळ करण्याच्या कारणावरून लोखंडी खंजराने हल्ला केला. आरोपींच्या अंगावर काळ्या रंगाचे जॅकेट होते आणि त्यांनी चेहऱ्यावर मास्क घातलेले होते.

या भयंकर हल्ल्यात राहुल दिपके याचा जागीच मृत्यू झाला. हर्ष दिपके याच्या पोटावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच फिर्यादीही जखमी झाले.

गुन्हा दाखल व तपास सुरू
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२५ कलम 103(1), 109, 118(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. तुरनर हे करीत आहेत.

आरोपी अजूनही फरार असून, पोलीस तपासाचा धागा पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *