अर्धापूर न्यायालयात महामानवास जयंतीदिनी अभिवादन

अर्धापूर:- उध्दव सरोदे – येथील न्यायालयात अधिवक्ता संघ अर्धापूरच्या वतीने भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुष्प, दिप, धुपाने उपस्थितांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर अधिवक्ता संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.भानुदास मगरे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महामानवाला आजच्या जयंतीचे अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व मी एक भाग्यवान व्यक्ती
आहे की,ज्याने बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयास भेट दिल्याने ते शासकीय विश्रामगृहात थांबले असता आम्ही सर्वांनी बाबासाहेब गॅलरीत थांबले असता त्यांना जय भिम करून पाहिलेले आहे अशी महत्त्वाची आठवण त्यांनी सांगितली.त्यानंतर अधिवक्ता संघाचे सहसचिव अॅड. सचिन देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त दरवर्षी सर्वांनी एक नविन नविन संकल्प केला पाहिजे आणि बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला आहे त्यानुसार आपण सर्वांनी बाबासाहेबांची जयंती ही व्यसनमुक्त जयंती साजरी करावी असा संकल्प व अपेक्षा त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.
त्यानंतर अधिवक्ता संघाचे सदस्य अॅड.गौरव उध्दवराव सरोदे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जगामध्ये सर्वात जास्त अभ्यासू, सर्वात जास्त पुस्तकांचे वाचन करणारे,स्वतः चे संपूर्ण घर पुस्तकांनी भरवून त्या घरास ग्रंथालय करणारे, सर्वात जास्त वाचन करण्याचा एकमेव छंद असलेले,१८-१८ तास सतत अभ्यास करणारी जगातील एकमेव व्यक्ती, प्रचंड पदवी प्राप्त करणारे भारतीय संविधानचे शिल्पकार महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉ. भिमराव उर्फ बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे त्यांना कोटी कोटी अभिवादन करून आपला भारत देश व विश्वातील सर्वांना जयंतीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो व बाबासाहेबांना त्यांची जयंती अपेक्षे प्रमाणे बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा
बाबासाहेबांना डोक्यात घेऊन अभ्यास केल्यानेच तूम्ही शिकून अभ्यास केल्यास नक्कीच अधिकारी व्हाल पण नाचून कधीच अधिकारी होणार नाहीत, त्यामुळे बाबासाहेबांनी सर्वांना एकमेव महत्त्वाचा संदेश दिला की, शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो त्याचे प्राशन करेन तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे शिका, संघटित व्हा व वेळ आल्यास संघर्ष करा असा मुलमंत्र दिला असे मोलाचे मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित अधिवक्ता संघाचे सचिव अॅड.दिपक लोणे, कोषाध्यक्ष अॅड.गजानन पत्रे,सदस्य अॅड. गणेश देलमडे,अॅड.आत्माराम राजे गोरे,अॅड.मंगेश सरोदे,अॅड.ओंकार देवडे, न्यायालयीन कर्मचारी माधव तेलंग, नागेंद्र जोंधळे आदि उपस्थित राहून सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.



