शहर

नांदेड : हबीब टॉकीज ते बर्की चौक मार्गावरील अवैध अतिक्रमणांवर धडक कारवाई 

नांदेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने नांदेड पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता हबीब टॉकीज चौक ते बर्की चौक या मार्गावर अवैध अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी शहरातील रस्त्यांवरील अवैध अतिक्रमणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाबाबत गांभीर्य दर्शवून संबंधित विभागांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक (इतवारा विभाग) व पोलीस निरीक्षक श्री. संजय शिंदे (पोलीस स्टेशन इतवारा) यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम पार पडली.

या मोहिमेदरम्यान अवैध अतिक्रमण करणाऱ्या २५ ठिकाणी कारवाई करण्यात आली असून, गाडे, फलक, बॅनर आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई दरम्यान महानगरपालिकेचे उप-आयुक्त श्री. अजितपालसिंग संधू, सहाय्यक आयुक्त श्री. सोनसळे, तसेच ७ अधिकारी आणि ४८ कर्मचारी सहभागी झाले होते.

याशिवाय, नांदेड पोलीस दलाचे ४ अधिकारी, १५ पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाचे एक प्लाटून, आणि दंगल नियंत्रण पथकाचे एक प्लाटून हे देखील मोहिमेमध्ये सहभागी होते.

पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारच्या अवैध अतिक्रमणांविरोधात कारवाई येत्या काळातही सुरूच राहणार आहे. नागरिकांनी रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतूक अडथळा निर्माण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या मोहिमेचे शहरवासीयांनी स्वागत करत पोलीस आणि महानगरपालिकेच्या संयुक्त कारवाईचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *