जिला

नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून नागरीकांना आवाहन : बेवारस वाहनांची ओळख पटवा, अन्यथा होणार लिलाव

नांदेड – नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरीकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२५ अखेर नांदेड शहर वाहतूक शाखा, वजिराबाद येथे मोटारसायकल, ऑटो अशा एकूण १४४ वाहने जमा करण्यात आलेली आहेत. मात्र, या वाहनांचे मालक अद्याप ओळखले गेलेले नाहीत.

या १४४ बेवारस वाहनांची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.nandedpolice.gov.in) तसेच ‘नांदेड पोलीस’च्या फेसबुक, इंस्टाग्राम (sp_nanded police) व ट्विटर अकाउंटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, ही यादी शहर वाहतूक शाखा वजिराबाद येथील नोटीस बोर्डवरही लावण्यात आली आहे.

पोलीस दलाने नागरीकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या नावे ही वाहने असतील किंवा संबंधित नातेवाईकांची मालकी असल्याचे सिद्ध करता येईल, त्यांनी पुढील दोन दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रांसह ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे. अन्यथा, ही वाहने कोणत्याही मालकाविना असल्याचे गृहित धरून कायदेशीर लिलावाची प्रक्रिया राबवली जाईल.

कोणत्याही अडचणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी नागरीकांनी शहर वाहतूक शाखा वजिराबाद, नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *