स्पोर्ट्स

जिल्हा क्रीडा संकुल उभारणीसाठी आमरण उपोषणास सुरुवात; नांदेड जिल्हा ऑलिंपिक संघटनेचा पुढाकार

नांदेड – जिल्ह्यातील क्रीडा विकासासाठी आवश्यक असलेले जिल्हा क्रीडा संकुल अद्यापही अस्तित्वात न आल्यामुळे, नांदेड जिल्हा ऑलिंपिक संघटना आणि एकविध क्रीडा संघटनेच्या वतीने २८ एप्रिल २०२५ पासून कौठा असदवन येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. बालाजी पाटील जोगदंड आणि प्रा. जयपाल रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून, क्रीडा संकुलासाठी राखीव असलेल्या २५ एकर जमिनीचे त्वरित हस्तांतरण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

या उपोषणाला जिल्ह्यातील मान्यवर खेळाडूंनी आणि क्रीडा प्रेमींनी भरघोस पाठिंबा दिला आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गोपिले, अनंत बोबडे, जस्विंदरसिंग रामगडिया, डॉ. राहुल वाघमारे, वृषाली पाटील जोगदंड, किशोर पाठक, रामन बैनवाड, डॉ. गजानन कदम, डॉ. विठ्ठल भंडारे, सचिन नरंगले, मनोज जोशी, डॉ. दिनकर हंबर्डे, प्रलोभ कुलकर्णी, प्रशांत आसमाने,

कन्हैया खांनसोळे, राष्ट्रपाल नरवाडे, संतोष चुनोडे, सुभाष कुरे, मुझेफ शेख, धोंडीबा चिकटवाड, समर्थ सूर्यवंशी, शिव रुद्र उदगीरे, प्रसन्नजीत जाधव, दुर्गेश सूर्यवंशी, आशिष राजपूत, श्रीहरी सातोनकर, दीपक जोगदंड, शशी पारडे, प्रताप राठोड, माधव दुयेवाड, कृष्णा दुयेवाड, विनश्री गडगिळे, किरण नागरे, वैजनाथ नावंदे, विष्णू जगळपुरे, अमोल शेंडगे, कृष्णा गव्हाणे, संतोष मिटकर, अमोल भालेराव आणि राम जाधव यांच्यासह असंख्य खेळाडू आणि पालकांनी सहभाग नोंदविला आहे.

उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, “ज्यापर्यंत क्रीडा संकुलासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. नांदेडकरांच्या भविष्यासाठी हा लढा आहे. “या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव वाढला असून, क्रीडाप्रेमींमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *