मराठवाडा

वक्फ अमेंडमेंट बिलच्या विरोधात मुस्लिमांचे बत्ती गुल आंदोलन

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / केंद्र सरकारने वक्फ अमेंडमेंट बिल 2025 लागू केल्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड यांनी दि. 30 एप्रिल रोजी रात्री संबंध देशभरातील मुस्लिमांना 09 ते 09.15 पर्यंत आपल्या घरातील, दुकानातील सर्व लाईट बंद करत वक्फ अमेंडमेंट बिलाचा निषेध करण्याचे आवाहन केले होते, मुदखेड शहरातील मुस्लिम समाजांनी 100% आपल्या घरातील, दुकानातील आणि आस्थापनेवरील सर्व दिवे बंद ठेवत निषेध नोंदविला

केंद्र सरकारने अलीकडेच देशात मुस्लिम समाजासाठी वक्फ अमेंडमेंट बिल 2025 पारित करत समाजाच्या सुधारासाठी आणून देशपातळीवर नवीन अध्यायास सुरुवात केली परंतु ज्या दिवसापासून या बिलाची घटना दुरुस्ती करण्यात आली तेव्हापासून वादग्रस्त ठरत असल्याचे दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्ड सक्रियपणे वक्फ अमेंडमेंट बिल 2025 चा विरोध करत देशातील 100 निवडक शहरांमध्ये लागू केलेल्या वक्त अमेंडमेंट बिल बद्दल मुस्लिम समाजासाठी सभा आणि कार्यक्रम घेत कसे तोटे असून काळाची गरज ओळखत व्यापक स्वरूपात या बिलाचा निषेध करणे ही एक मोहीम राष्ट्रीय पातळीवर राबवत असल्याचे दिसत आहे.

शहरातील इस्लामपुरा, बाजार मोहल्ला गुजरी जुने पोलीस स्टेशन समोरील भाग, नवी आबादी, मिल्लात नगर ,मदिना नगर ,बीलाल नगर , बागमार गल्ली, सादात नगर कॉलोनी आदी ठिकाणी मुस्लिम समाजातील नागरिकांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या आव्हानांना सकारात्मक प्रतिसाद देत बत्ती गुल संकल्पनेच्या माध्यमातून दिवे बंद करत निषेध नोंदविला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *