क्राईम

पोलीस स्टेशन अर्धापुरच्या पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करून बालविवाह रोखला; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड – 2 मे 2025: अर्धापुर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवत समाजात अत्यंत संवेदनशील कामगिरी केली आहे. या प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. डॅनिअल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कार्यवाहीत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु क-हाळे तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आडे यांचा मोलाचा सहभाग होता.

गुन्ह्याची हकीकत:

दिनांक 01 मे 2025 रोजी 11.00 वाजता, बेलसर गावात दगडोजी ऊर्फ नवनाथ भिमराव भोकरे या 26 वर्षीय तरुणाचा विवाह 16 वर्षे 6 महिन्यांची अल्पवयीन मुलगी यांच्याशी होणार असल्याची माहिती पोलिसांना अनोळखी व्यक्तीमार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने पंचायत समितीचे बीडीओ व ग्रामसेविका विद्या शिकारे यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली.

मुलीच्या आधार कार्डाची व पोलीस पाटील यांची खात्री झाल्यावर तिचे वय 06 नोव्हेंबर 2008 असल्याचे समोर आले आणि ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ विवाह थांबवण्यात आला.

आरोपींची नावे:

दगडोजी ऊर्फ नवनाथ भिमराव भोकरे, वैजनाथ गणपतराव बोकारे (मुलीचा काका), भिमराव पिराजी भोकरे यांनी मिळून हा बालविवाह घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी ग्रामसेविका विद्या शिकारे यांच्या फिर्यादीवरून बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या समाजोपयोगी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री अबिनाश कुमार यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *