क्राईम

माळाकोळी पोलिसांची कारवाई: दोन हायवा वाहने व 10 ब्रास अवैध वाळू जप्त, 40.50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड – माळाकोळी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, दोन हायवा टिप्पर वाहने आणि अंदाजे 10 ब्रास वाळू असा एकूण रु. 40.50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे (भोकर), श्री. सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप (कंधार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय डी. निलपत्रेवार (पो.ठा. माळाकोळी) व पोलीस अंमलदार पोहेकॉ नामदेव राठोड, पोकॉ अशोक फड, चा. पोकॉ अतुल क्षिरसागर यांचा समावेश होता.

जप्त मुद्देमालाचे तपशील: टाटा हायवा टिप्पर (MH-26-BE-8201): अंदाजे 5 ब्रास वाळू (किंमत ₹25,000/-) व वाहन किंमत ₹20,00,000/- भारत बेंझ टिप्पर (MH-26-CH-2409): अंदाजे 5 ब्रास वाळू (किंमत ₹25,000/-) व वाहन किंमत ₹20,00,000/- दोन्ही वाहने आणि वाळूसह एकूण ₹40,50,000/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *