जिला

माहूर पोलीसांची मोठी कामगिरी: आठ महिन्यांपासून फरार खुनातील आरोपी हैद्राबादहून अटकेत

नांदेड – माहूर पोलीस स्टेशनच्या पथकाने आठ महिन्यांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला हैद्राबाद (तेलंगणा) येथून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहेल बबलू देशमुख (वय 27, रा. रुई, ता. माहूर, जि. नांदेड) असे आहे. हा आरोपी 18 ऑगस्ट 2024 रोजी रुई गावात चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात फरार झाला होता.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक भोकर श्री. खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड श्री. सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मळघने (किनवट चार्ज माहूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:

18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 च्या सुमारास रुई (ता. माहूर) येथे शेतीच्या वादातून देशमुख कुटुंबातील दोन चुलत भावांमध्ये वाद होऊन त्यात एकाचा खून झाला होता. या प्रकरणात राहूल बबलू देशमुख याला तात्काळ अटक करण्यात आली होती, मात्र दुसरा आरोपी सोहेल देशमुख फरार झाला होता.

अटकेसाठी पोलिसांची मोहीम:

सहायक पोलीस निरीक्षक श्री शिवप्रकाश मुळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप आनेबोईनवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हैद्राबादमध्ये असल्याचे समजले. वरिष्ठांच्या परवानगीने पोलिसांनी हैद्राबादला जाऊन 3 मे 2025 रोजी सकाळी 10.43 वाजता आरोपीला अटक केली आणि माहूर येथे आणण्यात आले.

या कठीण आणि आव्हानात्मक मोहिमेसाठी पोहेकॉ. प्रकाश गेडाम, पो.कॉ. ज्ञानोबा खंदाडे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या यशस्वी अटकेबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *