उद्या बारावीचा ऑनलाईन निकाल; एका क्लिकवर पाहता येणार, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

नांदेड : प्रतिनिधी / महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून, विद्यार्थ्यांना एका क्लिकवर निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या वर्षी बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ दरम्यान पार पडली होती. परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त वातावरणात व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. काही ठिकाणी आढळून आलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई देखील करण्यात आली होती. दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या.
निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना डिजिलॉकर (https://results.digilocker.gov.in) वरून आपली गुणपत्रिका डाउनलोड करता येणार आहे. यानंतर मंडळाकडून मूळ गुणपत्रिका शाळा व महाविद्यालयांना पाठवण्यात येणार असून, ती विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:
-
www.mahresult.nic.in, www.mahahsscboard.in, http://hscresult.mkcl.org, https://results.digilocker.gov.in, https://results.targetpublications.org, https://results.navneet.com
निकाल तपासण्याची प्रक्रिया:
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा., “HSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा., आपला परीक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून “Submit” करा., तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल – तो डाउनलोड व प्रिंट करून ठेवा., निकालाची अधिकृत तारीख जाहीर झाल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



