मराठवाडा

एसबीआय स्टाफ युनियन (महाराष्ट्र सर्कल) च्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘शिवप्रसाद भामरे पॅनल’चा दणदणीत विजय!

नांदेड : स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन (महाराष्ट्र सर्कल) यांच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२५ मध्ये कॉ. शिवप्रसाद भामरे पॅनलने प्रचंड बहुमताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

या पॅनलमधील सर्व उमेदवारांना कर्मचारी वर्गाकडून भरघोस पाठिंबा मिळाला असून, एकजुटीचा आणि विश्वासाचा विजय ठरला आहे.

मुख्य पदाधिकारी विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत: कॉ. शिवप्रसाद भामरे – जनरल सेक्रेटरी (MC), कॉ. सुरेश चिंदरकर – अध्यक्ष (MC), कॉ. सुहास कटके – ऑर्गनायझिंग सेक्रेटरी (MC)

नांदेड झोनमधील विजयी उमेदवार: कॉ. राहुल खेडकर – उपाध्यक्ष, कॉ. अंजली स्वामी – उपमहासचिव, कॉ. विनोद नखाते – सहमहासचिव, कॉ. अविनाश काळे – सहकोषाध्यक्ष, कॉ. सुरज गरड – DOS (जनरल), कॉ. नेहा गोवंदे – DOS (महिला), कॉ. विश्वास भोसले – DOS (भूतपूर्व सैनिक), कॉ. श्रीचंद निलंगेकर – DOS (SC/ST/OBC), कॉ. शिवाजी पांडे – DOS (सब स्टाफ)

नांदेड रिजनमधील विजयी उमेदवार: कॉ. प्रबोधन भावसार – प्रादेशिक सचिव, कॉ. श्रीकांत पाटील – सह प्रादेशिक सचिव, कॉ. सौरभ राशतवार – सह प्रादेशिक सचिव, कॉ. कपिल महिंद्रकर – सह प्रादेशिक सचिव, कॉ. विठाबाई नाटकर – सह प्रादेशिक सचिव

या दणदणीत विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन! हा निकाल संघटनेतील एकतेचा आणि कर्मचार्‍यांच्या विश्वासाचा प्रतीक मानला जात आहे. यामुळे पुढील काळात कामगारांच्या हक्कांसाठी अधिक ठाम भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *