महाराष्ट्रा

करुणा शर्मा यांचा खळबळजनक आरोप : “धनंजय मुंडे यांनी फोनवर धमकी दिली, 18 तुकडे करण्याची भाषा केली”

मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खुद्द मुंडे यांनी फोन करून त्यांना 18 तुकडे करण्याची धमकी दिली असून, ही बाब त्यांनी पुराव्यांसह पोलीसांकडे दिली आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, “माझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि फोन कॉल्सचे पुरावे आहेत. धनंजय मुंडेंच्या लोकांकडून मला दबाव टाकण्यात येतो आहे. न्यायालयाने मला दोन लाख रुपये मासिक पोटगी देण्याचा आदेश दिला आहे, मात्र अजूनही मला ते पैसे मिळालेले नाहीत.”

तसेच त्यांनी हेही आरोप केले की, “धनंजय मुंडे यांनी फोनवर सांगितलं, तू खूप तोंड उघडत आहेस, माझ्या बहिणीवर बोलते आहेस. माझ्या डोक्यावरून पाणी गेलं तर सगळं उघड करीन.”

करुणा शर्मा यांनी स्पष्ट शब्दांत सरकारवरही टीका केली. “फक्त लव जिहादसाठी कायदे केले जातात, पण हिंदू समाजात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी कोण बोलणार?” असा प्रश्न त्यांनी मंत्रिमंडळाला विचारण्याचा निर्धार केला आहे. त्या येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेवटी त्या म्हणाल्या, “माझी बदनामी करा, माझे 18 तुकडे करा, मी घाबरत नाही. एका बापाची औलाद असाल तर कुठे करायचे ते सांगा, मी तिथे स्वतः जाईन.”

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *