महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीत संपादक अयुबखान पठाण यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

नांदेड:- उध्दव सरोदे – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे तथा प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार नांदेड जिल्ह्य़ातील कार्यकारिणीचा विस्तार करण्यासाठी शहरातील नामांकित विसावा हाॅटेल येथे बैठक पार पडली. सदर बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष संग्राम पाटील मोरे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे यांनी केले होते.या बैठकीत विद्यमान कार्यकारिणीचा विस्तार करण्यासह या संघटनेचे काम व्यापक करण्याबाबत चर्चा होऊन
विस्तारित कार्यकारिणीत आमचे मित्र तथा दै.सत्य मराठी वर्तमानपत्राचे संपादक अयुबखान पठाण यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर दै.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी रामेश्वर काकडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष व युवा कॉंग्रेस नेते बापूसाहेब पाटील यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने निवडीचे नियुक्तीपत्र सर्वांना देण्यात आले.नवनियुक्त सभासदांकडून या संघटनेचे काम संघटीत होऊन करणे व पत्रकार बांधवांसाठी अडचणीच्या वेळी कायमस्वरुपी काही कल्याणका री योजना राबविण्यावर विचार मांडण्यात आले.नवनियुक्त सदस्यांचे हितचिंतकाकडून अभिनंदन होत असून त्यातच नव्या
जबाबदारीमुळे संपादक अयुबखान पठाण यांच्या सामाजिक प्रसिध्दीत भर पडलेली असून त्यांच्या निवडीबद्दल दै.नांदेड चौफेरचे संपादक आरेफखान पठाण, दै.समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख, दै.सत्य मराठीचे कार्यकारी संपादक अजीज लहानकर इंजिनिअर,दै. दलितवाणीचे ज्येष्ठ पत्रकार उध्दवराव सरोदे,दै.समिक्षा वाचकमतचे पत्रकार अॅड.गौरव सरोदे व ईतर सर्वांनी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन करून स्वागत केले व सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



