क्राईम

लिंबगाव पोलिसांची कारवाई : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक, 4.08 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, 6 मे : पोलीस स्टेशन लिंबगाव अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 4,08,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव: विजय भास्कर ढगे (वय 40, व्यवसाय चालक/मालक, रा. धनगरटाकळी, ता. पूर्णा, जि. परभणी)

जप्त मुद्देमाल: 2.5 ब्रास रेती (किंमत – ₹8,000/-), टिप्पर (क्र. MH-06/AQ-7095) (किंमत – ₹4,00,000/-)
एकूण किंमत – ₹4,08,000/-

ही कारवाई ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याने पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार (IPS) यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली.

कारवाईतील सहभागी अधिकारी व अंमलदार: पंढरीनाथ बोधनकर, सपोनि, लिंबगाव, एन.एम. सय्यद, पोउपनि, लिंबगाव, पो.हे.कॉ. काझी (चा.पो.हे.कॉ./199), पो.कॉ. दत्तराव शिंदे (पो.कॉ./3234)

गुप्त माहितीच्या आधारे मौजे सुगाव ते पावडेवाडी रस्त्यावर रेल्वे ब्रिज जवळून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी धाड टाकून टिप्पर व रेतीसह आरोपीस अटक करण्यात आली.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत आगामी काळात अशा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *