क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई : 30.25 लाखांचा अवैध रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर जप्त

नांदेड, 6 मे : “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 30.25 लाख रुपये किमतीचा अवैध रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर जप्त केला आहे. आरोपीस घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार (IPS) यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुरज गुरव, खंडेराव धरणे, व सुशीलकुमार नायक या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील मार्गदर्शन केले.

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार: पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पो.हे.कॉ. 2168 शेख जावेद, पो.कॉ. 1591 मुबीन, पो.कॉ. 493 गायकवाड, पो.कॉ. 389 पवार

आरोपी: अंगद मधुकर येवले (रा. जानापुरी, ता. लोहा, जि. नांदेड) जप्त मुद्देमाल: हायवा टिप्पर (MH-26-CH-1428) — ₹30,00,000/- 05 ब्रास रेती — ₹25,000/- एकूण किंमत — ₹30,25,000/-

दिनांक 5 मे 2025 रोजी रात्री 11:00 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी पीव्हीआर कौठा रोडवर सापळा रचून सदर टिप्पर पकडला. हायवा टिप्पर अवैध रेतीसह नांदेडकडे जात असताना त्याला थांबवण्यात आले. वाहनाची झडती घेतल्यावर त्यामध्ये बेकायदेशीररित्या 5 ब्रास रेती सापडली. आरोपी अंगद येवले यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंद: पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गुरनं. 432/2025, कलम 303(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल.
तपास अधिकारी: पो.हे.कॉ. 2168 शेख जावेद

पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संबंधित अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्रतेने राबवण्याचे आदेश दिले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *