“अशोक चव्हाण दिशाहीन, आता ते भाजपाचे नोकर” — काँग्रेस नेते भानुदास माळी यांची टीका

मुंबई, 6 मे 2025 : भाजप नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केलेल्या “दिशाहीन” टीकेला काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे. काँग्रेस नेते भानुदास माळी यांनी चव्हाणांवर निशाणा साधत म्हटले की, “अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये मालक होते, आता भाजपात नोकर झालेत.”
भानुदास माळी यांनी स्पष्टपणे आरोप केला की, “चव्हाण स्वतःच दिशाहीन झाले असून, आता ते भाजपच्या आदेशावर चालतात.”
त्यांनी हेही म्हटले की, “पूर्वी काँग्रेससाठी लढणारे चव्हाण आता सत्तेच्या हव्यासापोटी विचारांशी तडजोड करत आहेत.”
अशोक चव्हाण यांनी अलीकडेच एका मुलाखतीत काँग्रेसवर टीका करताना सांगितले होते की, “पक्ष आता दिशाहीन झाला आहे आणि मतदारांचा विश्वास गमावत आहे.” त्यावरच भानुदास माळी यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
राजकीय वर्तुळात या शब्दयुद्धामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांवर या टीका-प्रत्युत्तराचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



