देश विदेश

खालील गाड्या मध्ये दोन डब्यांची कायम स्वरूपी वाढ.

 

उन्हाळ्यात होणारी प्रवाशांची गर्दी पाहता दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड – संत्रागाची – नांदेड एक्स्प्रेस आणि नांदेड – औरंगाबाद – नांदेड एक्स्प्रेस आणि औरंगाबाद – तिरुपती – औरंगाबाद एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची वाढ कायम स्वरुपात करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

1) गाडी क्रमांक 12767 / 12768 हजूर साहिब नांदेड – संत्रागाची – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) आणि एक द्वितीय श्रेणी शयन यान (स्लीपर क्लास) असे दोन डब्बे हजूर साहिब नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 12 मे 2025 पासून आणि संत्रागाची येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 14 मे 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत, या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.

2) गाडी क्रमांक 17620 / 17619 हजूर साहिब नांदेड – औरंगाबाद – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) आणि एक द्वितीय श्रेणी शयन यान (स्लीपर क्लास) असे दोन डब्बे हजूर साहिब नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 16 मे 2025 पासून आणि औरंगाबाद येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 18 मे 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत, या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.

3) गाडी क्रमांक 17621 / 17622 औरंगाबाद – तिरुपती – औरंगाबाद एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) आणि एक द्वितीय श्रेणी शयन यान (स्लीपर क्लास) असे दोन डब्बे औरंगाबाद येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 16 मे 2025 पासून आणि तिरुपती येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 17 मे 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत, या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 21 झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *