मराठवाडा

परभणी – मुंबई विशेष रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावे

परभणी शहर जिल्हा युवक काँग्रेसची मागणी

 

 

परभणीहून मुंबई ला जाणाऱ्या हज यात्रेकरु व त्यांचे मित्र नातेवाईकांची प्रचंड गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे विभागाने परभणी- मुंबई विशेष रेल्वेला अतिरिक्त डब्बे जोडण्यात यावे अशी मागणी परभणी शहर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड (DRM) यांना निवेदना व्दारे करण्यात आली आहे

नांदेड ,हिंगोली ,परभणी जिल्हा व्यतिरिक्त मराठवाडा व विदर्भातील हज यात्रेकरु मुंबई मार्गे पवित्र हजला जात आहे.मे महिन्यात मोठ्या प्रमाणात हज यात्रेकरु हजला मुंबई विमानतळावरुन जात आहे मुंबईला जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचे सोयीचे साधन आहे.हज यात्रेकरुंना सोडण्यासाठी त्यांचे मित्र व नातेवाईक मोठया प्रमाणात मुंबईला जातात.परंतू नांदेड -मुंबई विशेष रेल्वेला डब्बे कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे त्यामुळे रेल्वे विभागाने अतिरिक्त डब्बे जोडल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही.

त्यासाठी परभणी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अब्दुल सईद अहेमद यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे अधिकारी प्रदीप कामले यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अफवान खान, मोहसीन खान, सय्यद जाकेर आदी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *