मध्यवर्ती बस स्थानक रस्त्याचे काम संथ गतीने; बससेवा तात्पुरती कौठा येथे स्थलांतरित — प्रवाशांचे हाल, पावसाची शक्यता वाढली

नांदेड, १० मे २०२५: नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळील जुन्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम गेले मागील महिनाभर सुरु असूनही संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बसस्थानकातील बससेवा तात्पुरती कौठा येथे स्थलांतरित करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसच्या वेळा, स्थान बदल, आणि लग्न साराय मुळे प्रवाशांची गर्दी तसेच सुविधा नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः वृद्ध, महिला, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना अधिक त्रास होत आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यांमुळे हवामानात बदल जाणवत असून लवकरच पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जर पावसाळा सुरू झाला आणि काम अपूर्ण राहिले, तर चिखल, पाणी साचणे आणि अपघाताचा धोका यामुळे परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते.
प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कामाचा वेग वाढविण्याबाबत ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. प्रवाशांनी काम लवकर पूर्ण करून बससेवा पुन्हा मुख्य बसस्थानकावर हलवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास नांदेडकरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.



