जिला

प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथील बागेत अचानक आग, आयुर्वेदिक झाडांचे नुकसान

मुदखेड (ता. १० मे २०२५): तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील बागेत आज दुपारी सुमारे १.३० वाजता अचानक आग लागली. ही आग वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थान परिसरातील बागेत लागली असून, विविध प्रकारच्या आयुर्वेदिक व औषधी झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

सदरील बागेत आरोग्य केंद्राच्या वतीने आयुर्वेदिक झाडे लावण्यात आली होती. अचानक लागलेल्या या आगीमुळे झाडे जळून खाक झाली. आग लागल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी डॉ. झिकरे मॅडम, सुपरवायझर प्रदीप राठोड, आरोग्य सेविका हिंगोले ताई, आरोग्य कर्मचारी शिवाजी शिंदे, केसरबाई, तोडे सिस्टरपरिचर राठोड ताई यांनी तत्काळ पाण्याच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

त्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही आणि इतर इमारतींना धोका टळला. मात्र या आगीत अनेक औषधी व दुर्मिळ वनस्पतीचे नुकसान झाले आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी सूर्यप्रकाशामुळे कोरड्या गवताला लागलेली ठिणगी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती स्थानिक प्रशासन व वनविभागाला देण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून संभाव्य मोठा अनर्थ टळवला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *