शाहुजी बाबुराव वासमवार यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार’ प्रदान

छत्रपती संभाजीनगर, दि. 04 रोजी – नांदेड जिल्ह्यातील बुरुड समाज युवक संघटनेचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेल्या श्री. शाहुजी बाबुराव वासमवार यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सन्मित्र कॉलनी, रॉक्सी टॉकीज शेजारी येथे समग्र सोशल फाउंडेशन व नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
पुरस्कार भाजप आमदार मा. संजयजी केनेकर, एस.पी. जवळकर साहेब, श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी सुखदेवजी महाराज वाकी, महंत स्वामी भरतगिरी महाराज यांच्यासह उपस्थित असलेल्या साधू-संत, महंतगण आणि हजारो समाज बांधवांच्या साक्षीने वासमवार यांना देण्यात आला.
या गौरव सोहळ्यात युवक संघटनेचे साईनाथ नागेश्वर, साईनाथ गुडमलवार, गणेश वासमवार, गोविंद सोनवणे, व्यंकट महाराज गुळवे, माधव गुळवे, शिवराम दर्शन, डॉ. राजू नागेश्वर, मुकुंद वासमवार, तसेच प्रथमेश वासमवार, शुभम सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहुजी बाबुराव वासमवार यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि बुरुड समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य हीच या पुरस्काराची प्रमुख कारणे ठरली. त्यांच्या या सन्मानामुळे नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



