मुदखेड पोलीस ठाण्यात 23 बेवारीस वाहने मालकी कागदपत्रे आणून वाहने घेऊन जावे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांचे आवाहन

मुदखेड तालुका प्रतिनिधि मोहम्मद हकीम / मुदखेड पोलीस स्टेशन येथे गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस असलेले दुचाकी तसेच टेम्पो असे एकूण 23 वाहन ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आले असून ज्यांचे वाहन आहेत त्यांनी कागदपत्र आणून घेऊन जाण्याचे आव्हान मुदखेड पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा एप्रिल 2025 अखेर पोलीस स्टेशन मुदखेड अंतर्गत बेवारस रित्या मोटरसायकल तसेच टेम्पो या वाहनांची पोलीस स्टेशनच्या परांगणात वाहने उभे करण्यात आले असून संबंधित मालकांनी वाहनाची ओळख पटवून घेण्यासाठी पोलीस स्टेशन नोटीस बोर्डवर वाहन नंबर लावण्यात आले असून सदर वाहन तीन दिवसाच्या आत घेऊन जाण्यासाठी मुदत देण्यात आली असून या मुद्दतीनंतर बेवारस असलेले सर्व वाहन यांचा जाहीर लिलाव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी करणार असल्याचं एका प्रेस नोट द्वारे सांगितले आहेत.
बेवारस असलेले वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, पल्सर, फॅशन प्रो, स्प्लेंडर प्लस, होंडा शाईन, एक्टिवा, बजाज प्लेटिना, टीव्हीएस स्टार सिटी, हिरो शाईन, स्प्लेंडर प्लस, आणि एक चार चाकी टेम्पो असे वाहन मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये बेवारस असुन ज्यांची आहेत त्यांनी तात्काळ मुदखेड पोलीस स्थानात भेट देऊन आपल्या गाडीची वाहन कागदपत्रासह दाखल करून घेऊन जावे अन्यथा लिलाव करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी सांगितले.



