मराठवाडा

ग्यान माता विद्या विहार शाळेचे सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश

नांदेड दि. १४ ग्यान माता विद्या विहार सीबीएसई शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल दि. १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. ग्यान माता शाळेचे विद्यार्थी दरवर्षी सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळवत आहेत.
शाळेचे दोन विद्यार्थी ९९ टक्के घेवून उतीर्ण झाले आहेत. नहुष निषाद जोशी, निहार मनीष देशपांडे, प्रथम आले आहेत. सिया तुषार पाटील द्वितीय तर भाविका गितेश दोशी तृतीय तसेच विक्रमादित्य दयानंद माने चतुर्थश्रेणीत तर शौर्य राम भोसले हा पाचवा आला आहे.

एकूण २०० विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ४१ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले आहेत. ५९ विद्यार्थी ८० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले आहेत. ४३ विद्यार्थी हे ७० टक्के पेक्षा जास्त गुण घेतले आहेत.
१०० पैकी १०० गुण घेतलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे संस्कृत विषय: निहार मनीष देशपांडे, भाविका गीतेश दोशी, नहुष निषाद जोशी, विक्रमादित्य दयानंद माने, गणित विषय : निहार देशपांडे, नहुष जोशी, आय.टी. विषय निहार देशपांडे, नहुष जोशी, विक्रमादित्य दयानंद माने, शौर्य राम भोसले, फुरखान अहेमद, श्रीकुंज सुनील बालुरकर, अवंती मिलिंद भालेराव, राघव जयंतीलाल पटेल, प्रथमेश अनिल खांडेकर, श्रेया सचिन देशमुख, अथर्व संतोष चव्हाण यांनी यश संपादन केले.

ग्यान माता विद्या विहार आपल्या विद्यार्थ्यांना चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जबाबदारीची नेहमीच जाणीव करून देत असते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अथक प्रयत्न करत असते. या सोबतच विद्यार्थ्यांना सामाजिक, शारीरिक व आध्यात्मिक गुण जोपासण्यासाठी सदैव प्रेरित करत असते.
ग्यान माता विद्या विहार शाळेचे प्राचार्य फादर अनिल जॉर्ज यांनी शाळेच्या लौकिकानुसार निकाल लागल्याचे सांगितले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपप्राचार्य, सिस्टर्स आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *