शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांची मोठी कारवाई — एकूण ६,४२,२५०/- रुपये दंड वसूल

नांदेड | दिनांक १४ मे २०२५ / नांदेड शहरात वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांच्यामार्फत एक मोठी कारवाई राबविण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहनचालक, भरधाव वेगाने वाहन चालविणे आणि गणवेश न घालणाऱ्या ऑटोचालकांवर कडक कारवाई करत एकूण ६,४२,२५०/- रुपये दंड वसूल करण्यात आले.
दिनांक १३ मे २०२५ रोजी प्रभारी अधिकारी श्री. साहेबराव गुट्टे (पोलीस निरीक्षक, वजिराबाद) यांच्या नेतृत्वाखाली सिटी बी स्टाफ व दंगल नियंत्रण पथकाने रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट व कलामंदिर परिसरात पुढीलप्रमाणे कारवाई केली:
पेड केसेस: २५ – ₹२२,२५० दंड, ऑनलाईन UPI केसेस: ५ – ₹३,२०० दंड, अनपेड केसेस: ३२२ – ₹३,६१,००० दंड, ट्रिपल सीट वाहन: ७ – ₹७,००० दंड, गणवेश न घालणारे ऑटोचालक: १९० – ₹१,६४,००० दंड एकूण ५४९ केसेस करून ₹५,५७,४५०/- दंड वसूल.
तसेच, प्रभारी अधिकारी श्री. जगन्नाथ पवार (पोलीस निरीक्षक, इतवारा) यांनी देगलूर नाका, जुना मोंढा, लातूर फाटा, ढवळे कॉर्नर, बरकत कॉम्प्लेक्स, बर्की चौक येथे तपासणी केली.
एकूण ६७ केसेस करून ₹८४,८००/- दंड वसूल. दोन्ही विभागांनी मिळून ६१६ केसेस नोंदवत एकूण ₹६,४२,२५०/- चा दंड वसूल केला.
ही कारवाई मा. श्री. अभिनाश कुमार (पोलीस अधीक्षक), मा. श्री. सूरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या मोहिमेचे शहरवासीयांनी स्वागत करत वाहतूक शाखेचे अभिनंदन केले आहे.



