नांदेड पोलीस दलाकडून नागरिकांना जाहीर आवाहन — बेवारस दुचाकी वाहनांची ओळख पटवावी, अन्यथा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार

नांदेड, दि. १४ मे २०२५ नांदेड जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना एक महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड येथे २५ आणि पोलीस स्टेशन वजिराबाद येथे १६८ अशा एकूण १९३ दुचाकी वाहने बेवारस स्थितीत जमा आहेत. सदर वाहने अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यांमध्ये ठेवण्यात आली असून अजूनही त्यांच्या मालकांची ओळख पटलेली नाही.
या सर्व बेवारस दुचाकी वाहनांची यादी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.nandedpolice.gov.in, तसेच नांदेड पोलीस फेसबुक पेज (Nanded Police), इंस्टाग्राम (@sp_nanded_police) आणि ट्विटर (@policenanded) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
नागरिकांनी पुढील दोन दिवसांच्या आत सदर यादीतील वाहने स्वतःची किंवा आपल्या नातेवाईकांची असल्याचे मालकी हक्कासह पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष संपर्क करून सिद्ध करावेत. जर या मुदतीत कोणीही दावे केले नाहीत, तर संबंधित वाहने पूर्णपणे बेवारस असल्याचे गृहीत धरून कायदेशीर लिलावाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वाहनांच्या यादीची माहिती पोलीस स्टेशन शिवाजीनगर व वजिराबाद, नांदेड येथील नोटीस बोर्डवर सुद्धा उपलब्ध आहे.कुठलीही अडचण किंवा माहिती हवी असल्यास खालील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा:
-
पोलीस स्टेशन शिवाजीनगर: 02462-256520
-
पोलीस स्टेशन वजिराबाद: 02462-236500
नांदेड पोलीस दल नागरिकांना आवाहन करतो की, आपल्या वाहनांच्या मालकीची खात्री करून पुढील गैरसोयीपासून वाचावे आणि पोलीस दलास सहकार्य करावे.



