शिक्षण
शालांत परीक्षेत कु. केतकी भोरे ला ९५ टक्के गुण

नांदेड/प्रतिनिधी.. बाबा नगर येथील महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थिनी कु. केतकी प्रदीप भोरे ने शालांत परीक्षेत ९५.४० गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता शिवाजीराव भोरे यांची नात कु. केतकी ही प्राथमिक स्तरापासूनच आपली गुणवत्ता कायम ठेवत शालांत परीक्षेत विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाल्यामुळे सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. महात्मा फुले च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा कदम यांच्यासह सर्व विषय शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी कु. केतकी यांचे अभिनंदन करून भावी शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



