दहावीच्या परीक्षेत कु.ऋतुजा देशमुख हिचे घवघवीत यश ; दहावीत घेतले ९१.४० टक्के गुण

अर्धापूर :- उध्दव सरोदे / शहरातील बालाजी मंदिर भागातील स्वातंत्य सैनिक स्व.लक्ष्मीकांतराव देशमुख यांची नात कु.ऋतुजा श्यामसुंदर देशमुख हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.तिने मिळवलेल्या यशाबद्दल अर्धापूर शहर व परिसरात तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.ऋतुजा श्यामसुंदर देशमुख हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्या शाळा,अर्धापूर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण शहरातील मिनाक्षी देशमुख मुलींचे हायस्कूल मध्ये झाले. दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४५७ गुण मिळवून ९१.४० टक्केवारी घेतली आहे.ऋतुजाने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,काका काकू,भाऊ व शिक्षकांना दिले आहे.
ऋतुजा देशमुख ही लहानपणापासून अभ्यासात हुशार असून शहरात झालेल्या विविध स्पर्धेत तिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावलेले आहेत. दहावीच्या परीक्षेत ऋतुजा श्यामसुंदर देशमुख हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सुधाकरराव देशमुख,कृष्णा देशमुख, सुरेश देशमुख,अर्धापूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रविण देशमुख, आर.आर.देशमुख,पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, पत्रकार उध्दवराव सरोदे,अनिल देशमुख,डॉ. अनिरूध्द देशमुख,पोलीस जमादार रवि देशमुख,पोलीस अंमलदार प्रकाश देशमुख,किरण देशमुख,प्रशांत खैरनार,बबनराव लोखंडे, उमेश सरोदे, राजेंद्र साबळे,राजु देशमुख, अॅड.गौरव सरोदे,डॉ.प्रविण कामारीकर,गजानन पत्रे,कामारीकर कोचिंग क्लासेसचे संचालक आकाश कामारीकर व ईतर सर्वांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.



