जिला

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत नांदेड पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी, अनेक कार्यालयांना राज्यस्तरीय पुरस्कार

 

नांदेड, १७ मे २०२५: महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमांतर्गत नांदेड जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, या कार्याचे राज्य शासनाने गौरव केले आहे. विविध उपक्रमांची अंमलबजावणी आणि नवकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड पोलीस दलातील तीन कार्यालयांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलीस दलाने खालील महत्त्वाचे उपक्रम यशस्वीरित्या राबवले:

वेबसाईट अद्ययावत: पोलीस दलाच्या वेबसाइटचे आधुनिकतेने पुनर्रचना करण्यात आली.

ईज ऑफ लिव्हिंग उपक्रम: नागरिकांच्या सुरक्षेसाठी QR कोड स्कॅनिंग आधारित पेट्रोलिंग सुरु करण्यात आले. शहरात ७५४ व ग्रामीण भागात ७३१ ठिकाणी QR कोड बसविण्यात आले.

तक्रार निवारण केंद्र: दर शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करत एकूण १८११ तक्रारींचे निवारण करण्यात आले.

स्वच्छता अभियान: प्रत्येक मंगळवारी सर्व पोलीस कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जुन्या रेकॉर्डचे वर्गीकरण करून योग्यरित्या जतन व निर्गती करण्यात आली.

मुद्देमाल नाश: नोंदवलेले मुद्देमाल पंचनाम्यानंतर नष्ट करण्यात आले.

सुविधा उभारणी: पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिशा दर्शक फलक, सुसज्ज प्रतीक्षालय अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या.

जनजागृती व संवाद: कोचिंग क्लासेस व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात आल्या.

विशेष उपक्रम: ऑपरेशन बिट कनेक्ट, मिशन उडाण, मिशन समाधान, मिशन निर्भया, मिशन एकता, मिशन वारसा जतन, नांदेड पोलिस लीग इत्यादी सामाजिक व सुरक्षिततेसंबंधित उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले.

पुरस्कारप्राप्त कार्यालये: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कंधार – छत्रपती संभाजीनगर विभागातून दुसरा क्रमांक

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इतवारा – तिसरा क्रमांक
पोलीस स्टेशन, भोकर – विभागातून दुसऱ्या क्रमांकाचे गौरव

या यशाबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. हे यश संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून इतर विभागांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *