नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई; एक कोटी ७२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, १७ मे २०२५: गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹१,७२,९५,०००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस स्टेशन सोनखेड यांच्या संयुक्त पथकांनी केली.
दिनांक १६ मे २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे बेट सांगवी (कपिलेश्वर), ता. लोहा येथील गोदावरी नदी पात्रात पहाटे ४ वाजता छापा टाकण्यात आला. छाप्यात खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
३ हायवा (१५ ब्रास वाळूसह): ₹१,३५,७०,०००/-, ८ रेती उपसाचे इंजिन: ₹२४,००,०००/-
४६ तराफे: ₹११,५०,०००/-, ३५ ब्रास वाळू: ₹१,७५,०००/-
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹१,७२,९५,०००/-
यामध्ये तराफे जाळून नष्ट करण्यात आले. कारवाईदरम्यान ११ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित गुन्हे पोलीस स्टेशन सोनखेड येथे गु.र.नं. ११६/२०२५ ते ११९/२०२५ खाली कलम ३०३(२), ३(५) B.N.S. नुसार दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींची नावे: देविदास बापुराव सोनटक्के (रा. शेवडी), नागनाथ बाबाराव लुटे (रा. शेवडी), कृष्णा लुटे (रा. शेवडी), रामेश्वर सखाराम गवते (रा. पेनुर), अनिल घोडके (रा. पेनुर), गोविंद वानखेडे (रा. बेट सांगवी कपिलेश्वर), मंगेश आव्हाड (रा. पेनुर), अमोल गवते (रा. पेनुर), राजू गवते (रा. पेनुर), आप्पाराव राजळे (रा. पेनुर), विजय शिवाजी राठोड (रा. काशीराम तांडा)
कार्यवाही करणारे अधिकारी:, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
सपोनि पांडुरंग माने व स्थानिक गुन्हे शाखा आणि पो.स्टे. सोनखेडचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचा समावेश
या यशस्वी कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी संबंधित पथकांचे विशेष कौतुक केले असून, पुढील तपास पोलीस स्टेशन सोनखेडमार्फत सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड



