क्राईम

खुजडा-टाकळी येथे गोदावरी नदीत अनधिकृत वाळू उत्खनन करणारी यांत्रिकी बोट तहसीलदारांच्या धाडीत जिलेटिनच्या साह्याने उद्ध्वस्त

 

मुदखेड तालुका प्रतिनिधि मोहम्मद हकीम / मुदखेड तालुक्यातील खुजडा-टाकळी शिवारात गोदावरी नदीपात्रात बोटीच्या साह्याने अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ पथकासह धाड टाकून कारवाई केली. आज दुपारी सुमारे पाच वाजता करण्यात आलेल्या या धाडीत यांत्रिकी बोट ताब्यात घेऊन जिलेटिनच्या साह्याने ती उद्ध्वस्त करण्यात आली.

अनधिकृत उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कारवाई ठोस असून यामध्ये तहसील कार्यालय, महसूल आणि पोलीस विभागाने संयुक्त सहभाग नोंदवला. कारवाईच्या वेळी मंडळाधिकारी एच. जी. पठाण, ग्राम महसूल अधिकारी गोपाल माने, श्री. कोटूरवार, विश्वनाथ बोदमवाड, मनोज वाघमारे, राजू चव्हाण, मस्के, गलांडे, पोलीस पाटील (खुजडा) गुंतापले, पोलीस पाटील (टाकळी) श्री. शिंदे, कोतवाल श्याम कोलते, वाहन चालक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, बिट जमादार चक्रधर आणि पुणेबॉईनवाड यांचा सक्रिय सहभाग होता.

या धाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असून, पुढील काळात अशा स्वरूपाच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. देऊळगावकर यांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *