टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना च्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे एकदिवसीय धरणे आंदोलन

नांदेड. दि. १९ / ऑटोरिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संलग्न टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे राज्यस्तरीय एकदिवसीय धरणे आंदोलन
नेतृत्व कृती समितीचे महाराष्ट्र मा.अध्यक्ष शशांक राव साहेब, महासचिव मा.विलास भालेकर साहेब मराठवाडा कार्याध्यक्ष मा.अहेमद (बाबा)
वाहतूक पोलीस व आर.टी.ओ. व महापालिकेच्या , बेकायदेशीर व मनमानी कारभाराच्या निषेधार्थ प्रशासन, संबंधित अधिकारी ,संबंधित विभाग ,आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे असल्यामुळे आंदोलन
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ही बाईक टॅक्सी ला परवानगी दिली ती रद्द करून , ऑटोरिक्षा चालक महामंडळ च्या अनेक तुरटया दूर करने, शहरातील अवैध्य वाहतूक मनपा बाहेर काढणे ,शहरातील अवैध अतिक्रमण काढणे,वाहतूक पोलीस चालक रवींद्र राठोड यांची तात्काळ बदली करणे, ऑनलाईन चालन चुकीचे होत आहेत ते बंद करणे, कारवाईच्या नावावर रिक्षाचालकाला टार्गेट करणे बंद करणे, शहरातील खुले परवाने बंद करणे शहरातील अवैध्य वाहतूक मनपा हद्दीबाहेर काढणे, जोपर्यंत थांबे नाही तोपर्यंत रिक्षा चालकावर कारवाई न करणे, आदी मागण्या बाबत
बुधवार दिनांक:- 21 में 2025 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे राज्यस्तरीय एक दिवशी धरणे आंदोलन
वेळ 11 ते 2 वाजेपर्यंत तरी सर्व पदाधिकारी सदस्य रिक्षा चालक मालक यांनी आंदोलनास उपस्थित रहावे
प्रमुख मागण्या
1) महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ई बाइक टॅक्सीला परवानगी दिलेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी.
2) ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ ची अंमलबजावणी झालेली महामंडळाचे तुरट्या दूर करून सवलती स्पष्टपणे देणे
3) नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अवैध वाहतूक , ऑपे रिक्षा ,टाटा मॅजिक , खाजगी फोर व्हीलर,टपा वाहतूक लोकल ट्रॅव्हल्स ,व मुंबई पुणे ,नागपूर ,म.न.पा . हद्दी बाहेर काढणे
4) नांदेड शहरातील खुले परवाने तात्काळ बंद करणे शहराच्या मर्यादा पेक्षा जास्त झालेले आहे ते तात्काळ बंद करा
5) वाहतूक पोलीस शाखेचे चालक रवींद्र राठोड यांची गुप्त चौकशी करून तात्काळ बदली करा
6) वाहतूक पोलीस कारवाईच्या नावावर फक्त ऑटोरिक्षा चालक ,मालक यांना टार्गेट करत आहे ते बंद करा.
7) वाहतूक पोलिसांनी परवाना धरण ऑटोरिक्षा पकडल्यावर जाग्यावरच कागदपत्राची तपासणी करून सोडून देण्यात यावे
8) नांदेड शहरात परवाणा धारक ऑटोरिक्षा चालक व प्रवाशांसाठी सोयीसाठी चढणे उतरण्यासाठी थांबे देण्यात यावे
9) नांदेड शहरातील प्रत्येक चौकातील अवैध अतिक्रमण काढून वाहतुकीसाठी व रहदारीसाठी खुले करणे व
हिंगोली गेट ते बाफना येथील दोन्ही रोडवरील फोर व्हीलर चे अतिक्रमण काढणे
11) नांदेड शहरातील ऑटोरिक्षाचे फिटनेस तपासणीसाठी वाघी येथे पासिग ट्रॅकवर गेल्यावर तेथील कर्मचारी ऑटो रिक्षा चालकांची पिळवणूक करत आहे ते तात्काळ बंद करणे
10) रिक्षा चालक मालक यांच्या साठी प्रादेशिक परिवहन कार्यालय कामकाजासाठी स्वतंत्र खिडकी निर्माण करावी



