नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई:
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर आणि जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कठोर कारवाई, एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल

नांदेड, १९ मे २०२५: नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार (IPS) यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह’ अंतर्गत पोलिसांनी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे व त्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर धडक कारवाई केली.
ही कारवाई मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि. श्री. भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
विभागनिहाय माहिती पोलीस स्टेशन विमानतळ हद्दीत: ग्यानमाता शाळेजवळ कर्मवीर नगर: इसम दारू पिऊन शांततेचा भंग करताना पकडला गेला. त्याने पोलिसांशी गैरवर्तन केल्यामुळे गु.र.क्र. 197/2025, भा.दं.वि. कलम 132, 352 नुसार गुन्हा दाखल.
सार्वजनिक शांततेचा भंग: इसमावर म.पो.का. कलम 110/117 अंतर्गत कारवाई.
ठाकरे कॉम्प्लेक्स आनंदनगर व नागार्जुन हॉटेल समोर: दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या २ इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 नुसार गुन्हे दाखल.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत: होंडा शोरूमजवळ आणि ज्योती टॉकीज परिसरात: सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ३ इसमांवर म.पो.का. 110/117 नुसार कारवाई.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत: MIDC मुख्य रस्त्यावर: दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या २ इसमांवर म.पो.का. 110/117 नुसार कारवाई.
पोलीस स्टेशन इतवारा हद्दीत: जुना मोंढा वाईन शॉपजवळ: १ इसमावर म.पो.का. 110/117 अंतर्गत कारवाई.
पोलीस अधीक्षकांचे अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, तसेच दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारची कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळावी, शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ही मोहीम पुढील काळातही शहरात सातत्याने राबविण्यात येणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे पथक सज्ज आहे.



