शहर

चौफाळा ते पैहलवान टी हाऊस दरम्यान ड्रेनेज लाईन आणि रास्तेचा बोगस कामामुळे नागरिक त्रस्त – मनपाकडे लक्ष देण्याची मागणी

 

नांदेड, 21 मे 2025: चौफाळा ते पैहलवान टी हाऊस दरम्यान नव्याने ड्रेनेज आणि रस्त्याचे काम सुमारे दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या एक आठवड्यापासून मुख्य रस्त्यावर ड्रेनेज चांबर भरून वाहत असून वाहतूक व पादचाऱ्यांसाठी ही परिस्थिती धोकादायक बनली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मते, ठेकेदाराने केवळ औपचारिकता म्हणून बोगस काम करून लाखो रुपयांचा निधी वाया घातला आहे. रस्त्यावर ड्रेनिजचा पाणी साचलेल्या मुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ड्रेनिजचा पाणी मुळे अपघाताची शक्यता वाढली असून अनेकांनी त्या भागातून जाणे टाळणे सुरू केले आहे.

“काम तर झाले पण फक्त नावालाच. आम्हाला रोजचा त्रास सहन करावा लागतोय. हे काम नव्याने आणि योग्य पद्धतीने व्हायलाच हवं,” असे संतप्त नागरिकांनी सांगितले.

या बोगस कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे व ड्रेनेजचे काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करण्यात यावे, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.

नांदेड महानगरपालिकेने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे आणि नागरिकांचा त्रास लवकरात लवकर दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *