जिला

घराचे स्वप्न साकार होणार आवास प्लस टप्पा-२ सर्वेसाठी मुदतवाढ 31 मे अखेरची संधी

 

 

नांदेड, 22- प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण अंतर्गत बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र कुटुंबांसाठी एक सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध झाली आहे. आवास प्लस टप्पा-1 मध्ये नजरेतून सुटलेले, सिस्टीममध्ये रिजेक्ट झालेले व नव्याने पात्र ठरलेले लाभार्थी यांचे सर्वेक्षण आता आवास प्लस टप्पा-२ अंतर्गत करण्यात येत आहे. यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची अधिकृत परवानगी मिळालेली आहे. हे सर्वेक्षण मार्च 2025 मध्ये सुरू झाले आहे. सुरुवातीला 15 मे ही अंतिम मुदत होती, मात्र आता ती वाढवून 31 मे 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अद्याप पक्के घर नाही, अशा सर्वांनी आवास प्लस 2024 मोबाईल ॲपव्‍दारे किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकारीमार्फत माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी केले आहे.

सन 2017-18 मध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात अनेक पात्र लाभार्थी सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे वगळले गेले होते. आता या सर्वांना दुसरी सुवर्णसंधी देण्यात येत आहे. हे सर्वेक्षण लाभार्थी स्वतः तसेच ग्रामपंचायत अधिकारी या दोन्ही मार्गांनी करता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 65 हाजर 147 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यामध्ये 25 हजार 206 जणांनी सेल्फ सर्वे केला आहे, तर 39 हजार 941 नोंदी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत झाल्या आहेत. ज्या नागरिकांना स्वतः सर्वे करता येत नसेल, त्यांनी आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मदतीने माहिती भरावी.

सर्वेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, बँक खाते पासबुक, वास्तवाचे फोटो, व जॉब कार्ड यांचा समावेश आहे. आवास प्लस 2024 मोबाईल ॲपव्‍दारे PMAY वेबसाईटवर माहिती इंग्रजी किंवा हिंदी भाषेत भरता येईल. पात्र लाभार्थी स्वतःच्या किंवा इतरांच्या मोबाईलवरूनही सर्वे करू शकतात. ही घरकुल मिळविण्याची अत्यंत महत्त्वाची संधी असून, बेघर व कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

आवास प्लस सर्वेक्षण कसे करावे यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने एक माहितीपूर्ण व्हिडीओ तयार केला आहे. सदर व्हिडीओ जिल्हा परिषदेच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी हा व्हिडीओ नक्की पाहावा, जेणेकरून सर्वेक्षण करताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *