क्राईम

पोलीस स्टेशन विमानतळ व स्थागुशा नांदेड यांनी खुनाच्या गुन्हयातील एक आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालकांना २४ तासांत घेतले ताब्यात

 

नांदेड | २१ मे २०२५ : पोलीस स्टेशन विमानतळ येथे दिनांक २० मे २०२५ रोजी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालकांना केवळ २४ तासांच्या आत अटक करण्यात नांदेड पोलीसांना यश आले आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार (IPS) यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते.

या गुन्ह्याचा तपास व आरोपींचा शोध घेण्याचे काम मा. श्री. खंडेराव धरणे (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. श्री. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड), व श्रीमती अश्विनी जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार चार्ज नांदेड शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

तपास पथकाची कामगिरी : गणेश चव्हाण (पोनि, विमानतळ) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले होते. तसेच स्थागुशाचे पोउपनि मिलींद सोनकांबळे, पोउपनि विनोद साने, गोविंद जाधव, दत्ता वाणी, कल्याणकर यांसह पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सहभागी अंमलदार : पोहेकॉ. दारासिंग राठोड, शेख जावेद, किशन चिंतोरे, वैजनाथ कानगुले, जुबेर चाऊस, रितेश कुलथे, राजेश माने, शेख शोएब, दिगंबर डोईफोडे, संतोष राणे, नागनाथ स्वामी, सिध्दीकी, साई सोनसळे, भारत गुरूपवार आणि सायबर सेलचे राजू सिटीकर यांनी मोठे योगदान दिले.

आरोपीचे तपशील : अजय उर्फ ओम्या जळबा सुर्यवंशी, वय २१ वर्षे, रा. शिखाची वाडी ता. मुदखेड, जि. नांदेड, ह.मु. बऱ्यामसिंघ नगर, नांदेड तसेच दोन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्ह्याचा तपशील : पोस्टे विमानतळ येथे दाखल गु.र.क्र. २००/२०२५, कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३(५) बीएनएस अन्वये खुनाचा गुन्हा दाखल होता. गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपींना शोधण्यात आले.

सदर उत्कृष्ट तपास आणि कार्यवाहीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. पोलीस दलाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नांदेडकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *