क्राईम

नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई – सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

 

नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार (IPS) यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या “नांदेड सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राइव्ह” अंतर्गत विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली.

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, पथकप्रमुख सपोनि श्री. भागवत नागरगोजे व चार्ली पथकातील पोलीस अंमलदारांनी दिनांक २२ मे २०२५ रोजी ही कारवाई केली.

कारवाईचा तपशील: पोलीस स्टेशन विमानतळ – चार्ली क्रमांक १ नागार्जुन हॉटेलजवळ ऑमलेट गाडीवर एक इसम दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल.

आनंद नगर रोड येथे २ इसम सार्वजनिक शांतता भंग करताना सापडले. त्यांच्यावर म.पो.का. कलम 110/117 अंतर्गत कारवाई.

पोलीस स्टेशन शिवाजीनगर – चार्ली क्रमांक ३, ज्योती टॉकीज रोड येथे एक इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन त्रास देत होता. त्याच्यावर म.पो.का. 110/117 अंतर्गत कारवाई.

पोलीस स्टेशन भाग्यनगर – चार्ली क्रमांक १, नक्षत्र मंगल कार्यालयाजवळ एक इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करत होता. त्याच्यावरही म.पो.का. 110/117 अंतर्गत गुन्हा दाखल.

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण – चार्ली क्र. १, २, ३, ढवळे कॉर्नर व दूध डेअरी परिसरात दोन इसम दारू पिऊन त्रास देत होते. दोघांवर म.पो.का. 110/117 अंतर्गत कारवाई.

पोलीस स्टेशन वजिराबाद – चार्ली क्र. १ व ३, कोर्ट परिसर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे ३ इसम दारू पिताना आढळले. तिघांवरही म.पो.का. 110/117 अंतर्गत कारवाई. पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,

“नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी कोणीही दारू पिऊ नये, किंवा दारू पिणाऱ्यांना जागा उपलब्ध करून देऊ नये. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”

ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि सार्वजनिक शांतता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *