क्राईम

देगलुर व बिलोली पोलिसांची मोठी कारवाई: पत्रकार व पोलीस बोर्ड लावून गोवंश चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे ६ आरोपी इनोव्हा गाडीसह अटकेत

 

नांदेड जिल्ह्यातील देगलुर व बिलोली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गोवंश चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून, ६ आरोपींना इनोव्हा वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरोपी वाहनावर ‘पत्रकार’ व ‘पोलीस’ अशी बनावट ओळख दर्शविणारी बोर्डे लावून गुन्हा करत होते.

गुन्ह्याचा तपशील: अभिनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती.

याअंतर्गत, दिनांक २२ मे २०२५ रोजी देगलुरचे पो.नि. मारोती मुंडे, सपोनि अश्रुदेव पवार, पो.उ.नि. नरहरी फड व त्यांच्या पथकाने बिलोली पोलीस ठाण्याच्या सहकार्याने संयुक्त तपास करताना MH 02 AP 7008 क्रमांकाची इनोव्हा गाडी अडवली.

सदर वाहनात 6 आरोपी आढळून आले. त्यांनी गाडीवर पोलीस व पत्रकार अशी बनावट ओळख लावून गोवंश चोरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी देगलुर शहरातून गोवंश चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे व पत्ते: सय्यद अमीर अली सय्यद अन्वर अली (वय 23), सय्यद उमर सय्यद फारुख (वय 22), अब्दुल कलाम अब्दुल सलाम (वय 22), सय्यद शोएब सय्यद फारुख (वय 33) — सर्व रा. लेबर कॉलनी, नांदेड, महेबुब पाशा शेख (वय 23) रा. कुर्ला कसाईवाडा, मुंबई, समीर अनिस खपरेशी (वय 22) — रा. दुधनाका, कल्याण, मुंबई

जप्त मुद्देमाल: इनोव्हा गाडी (MH 02 AP 7008) — किंमत अंदाजे ₹१० लाख

संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलुर, मारोती मुंडे, पोलीस निरीक्षक, देगलुर, अश्रुदेव पवार, सहायक पोलीस निरीक्षक, नरहरी फड, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी: केंद्रे, कृष्णा तलवारे, मलदोडे, सगरोळीकर, मोटरगे, बंगई, मुदीराज, नामपल्ले

आरोपींना न्यायालयात हजर करून ६ दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. “पोलिसांच्या सजगतेमुळे एक मोठा गुन्हा टळला असून, अशा प्रकारच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

 

 

 

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *