शहर

वजिराबाद येथे रस्ता रुंदीकरणासाठी १५–२० दिवसांपासून सुरू असलेले खोदकाम

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खांब कोसळला, नागरिक आणि दुकानदार त्रस्त

 

नांदेड (वजिराबाद): शहरातील वजिराबाद परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेले खोदकाम सध्या स्थानिक नागरिक आणि दुकानदारांसाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

या कामामुळे नुकताच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खांब (पोल) रस्त्यावर कोसळल्याचे समोर आले आहे. या कॅमेऱ्याद्वारे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून यंत्रणा उभारली होती. मात्र कामातील निष्काळजीपणामुळे हा महत्त्वाचा कॅमेरा निकामी झाला असून, त्याची कोणतीही दखल अद्याप प्रशासनाने घेतलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

स्थानिक दुकानदारांनी सांगितले की, “रस्ता खणल्यापासून आमचा व्यवसाय ठप्प झाल्यासारखा आहे. ग्रहक येत नाहीत, लहान मुले दुकानांवर पोहचू शकत नाहीत, आणि आता तर सीसीटीव्ही खांबही पडला.”

नांदेड शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रभावी यंत्रणा उभारली होती. मात्र, महसूल व बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

“याची दखल संबंधित विभाग घेणार का?”, अशी विचारणा सध्या नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे. लोकांमध्ये चर्चा आहे की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसवलेले कॅमेरेच जर या प्रकारे नष्ट होणार असतील, तर खर्चाचे व उपयोगाचे काय?

नांदेड महापालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्त कॅमेरे दुरुस्त करावेत आणि रस्ता लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी आता नागरिक व व्यापारीवर्ग करत आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *