जिला

महसूलमंत्र्याच्या नावाचा दुरुपयोग करून वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार

 

नांदेड/ महाराष्ट्र राज्याच्या महसुल मंत्री महोदय यांच्या नावाने अवैधरित्या तेलंगानातील कांही रेती तस्करांनी नांदेड जिल्हयातील बिलोली तालुका येथील मौजे गंजगाव येथील ठेकेदार वीरभद्र परबता कनशेटटे यांच्या नावाने नाममात्र शासन रेती पावत्या गट क्र. 280 नावाने देवून महाराष्ट्र व तेलंगाना शासनाची दिशाभूल करत प्रस्तावीत रेती घाटास गट क्र.325 असलेल्या सागरबाई बाजीराव पाटील यांच्या घाटातून व शासकीय महाराष्ट्र व तेलंगाना घाटातून अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करीत असल्याने यांच्यावर महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम व तेलंगाना राज्याच्या नियमानुसार फौजदारी व दंडात्मक गुन्हे दाखल करुन तात्काळ घाट बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर व आदिवासी कोळी समाजसंघांचे शंकर तमन बोईनवाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
बिलोली तालुक्यातील गंजगांव येथील खाजगी वाळू स्थळाच्या नावाखाली वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्या जात आहे. महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री महोदयाच्या नावाने नांदेड जिल्हयातील मौजे गंजगाव रेती घाटाव हैदोस घालणाऱ्या तेलंगाना राज्यातील रेती तस्कारांवर तात्काळ सीमा बंदी करण्याची कार्यवाही करण्यासह महाराष्ट्र शासनाची व तेलंगाना शासनाची रेती चोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील गट क्र.२८० व ३२५ यांच्या मूळ मालकांवर शासन नियम व अव शर्तीचे भंग केले असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करू दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.
व तसेच सदर रेती घाट चालवणारे हे तेलंगाना राज्यातील असून ते महाराष्ट्र राज्यातील महसूल मंत्री श्री. चंद्रशेखेर बावनकुळे यांची प्रतिमा मल्लिन करत असून सदर दिलेला घाट तात्काळ बंद करण्या कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा 28 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थाना समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा राहुल जिगळेकर व शंकर तमन बोईनवाड यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *