जिला
आडगाव येथील शेतकऱ्याला वीज पडून मृत्यूनंतर मदत – 64 हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात

लोहा (प्रतिनिधी): लोहा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी गजानन वाके यांची बैलजोडी वीज पडून मृत्युमुखी पडली होती. या घटनेनंतर लोहा तहसील कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती विभागामार्फत लोहा-कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यानंतर शेतकरी वाके यांना 64 हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात आला.
आज झालेल्या मदतनिधी वाटप कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ वाले, नायब तहसीलदार राजेश पाठक, मसुल लिपीक राहुल सुतार, पेशकार खोबराजी जाधव आदी उपस्थित होते. या मदतनिधीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला थोडा आधार मिळणार आहे. छायाचित्र : विनोद महाबळे



