भाग्यनगर पोलिसांनी अंतरजिल्हा मोटरसायकल चोरणारी टोळी जेरबंद; २६ मोटरसायकलींसह 18.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आंतरजिल्हा मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत २६ मोटरसायकलींसह १८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, पोलिस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.
पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोहेकॉ. गजानन किडे, विशाल माळवे, पठाण, तसेच सायबर सेलचे पो.उपनिरीक्षक मारोती चव्हाण यांचा समावेश होता. या पथकाने कॅनाल चौक येथील दीपक पान शॉपजवळ संशयित इसमांवर कारवाई केली.
यावेळी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे कबूल केले. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतून चोरलेल्या २६ मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या.
अटक आरोपींची नावे अशी आहेत: माधव शंकरराव राजेगोरे (वय २१), संतोष सुधाकर बंगाले (वय २१), बालाजी शंकरराव राजेगोरे (वय २०), आत्माराम ऊर्फ भैय्या बालाजी कदम (वय १९), मंगेश संजय लोमटे (वय २०)
या सर्व आरोपींनी एकत्रितपणे जिल्हाभर मोटरसायकल चोरी केल्याचे उघड झाले आहे. सदर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलिस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक नरेश वाडेवाले करत आहेत.



