मंगल परिनय सोहळ्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती

कायदा सर्वोपरी असतो, जनहितार्थ असतो, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो
मार्गदर्शक विलास भालेकर नेतृत्व अहेमद ( बाबा)
टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान ऑटोरिक्षा चालक व टायगर चे सदस्य चौरे यांची कन्या चे मंगल परिनय सोहळा संपन्न झाला आनंद सागर मंगल कार्यालय नांदेड येथे चौरे व कांबळे आयु.पोणिमा आयु.राजेश यांचा
मंगल परिनय सोहळ्यात संपन्न झाला या सोहळ्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती राबविण्यात आली
नांदेड :- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभिन्न अंग असलेला ऑटोरिक्षा चालक हा नेहमीच टीकेचा धनी असतो. ओव्हरसीट वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा अशी त्याची प्रतिमा सामान्य नागरिकात आहे. त्याची हि प्रतिमा पुसण्यासाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेने ऑटोरिक्षा चालकात वाहतुकीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वाहतूक सुरक्षा पंधरवाड्याचे आयोजन केले आहे.टायगर संघटनेचे मार्गदर्शक मा. विलास भालेकर व प्रदेश अध्यक्ष अहेमद (बाबा) , कोषाध्यक्ष धम्पाल थोरात, महंमद साबेर यांच्या नेतृत्वात झालेल्या या जनजागृती दि. 25 में २०२५ रोजी नांदेड शहरातील महत्वाच्या उप विभागीय पोलीस अधिक्षक नाईक साहेब, इतवारा वाहतूक प्रभारी पोलीस इंगळे साहेब व देगलूर नाका सिडको,, रेल्वे स्टेशन,माहात्मा फुले चौक प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झाले.
वाहतूक सिग्नल चे पालन करा, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नका, कागदपत्रे अद्यावत ठेवा, गणवेश घालून व्यवसाय करा, स्टॉप लाईन मागे थांबा, ओव्हरस्पिड वाहतूक करू नका, रॉंग साईड वाहन चालवू नका , प्रवाशांसोबत सौजन्याने वागा , कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,असे पत्रके घेऊन टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकारी, सभासदांनी आज लग्न समारंभ नवरी नवरदेव यांच्या हातात फलक देऊन जनजागृती अभियान राबविले महत्वाच्या ट्राफिक सिग्नलवर उभे राहून ऑटोरिक्षा चालकांमध्ये जनजागृती तर केलीच पण सोबत त्या चौकातील वाहतूक व्यवस्था सुद्धा सांभाळली. या मोहिमेची सुरवात इतवारा वाहतूक पोलीस स्टेशन येथून झाली होती. जनजागृती मोहिमेला ऑटोरिक्षा चालक आणि सर्वसाधारण नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन करून प्रतिसाद दिला.
सर्व महत्वाचा चौकात जनजागृती अभियान राबविल्यानंतर सभासदांनी एक दिवस रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथील ऑटोरिक्षा चालकांत सुद्धा जनजागृती केली.
कायदा सर्वोपरी असतो , जनहितार्थ असतो , कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष असतो . व्यवसाय करतांनी प्रत्येक ऑटोरिक्षा चालकांनी नियमाचे पालन करावे. असे मा. अहेमद (बाबा )
ऑटोरिक्षा चालक नियमाने गणवेश घालून व्यवसाय करतांनी दिसले , त्यांना मी नियमाचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटोरिक्षा चालक आहे …मला याचा अभिमान आहे !
असे प्रेषित बॅच कार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .
टायगर ऑटोरिक्षा चालक संघटनेचेप्रदेश अध्यक्ष यांनी यावेळी अनेक ऑटोरिक्षा चालकांसोबत मैत्रीपूर्ण संवाद साधला. या जनजागृती अभियानाला यशस्वी करण्यासाठी टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र चे
प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) , कोषाध्यक्ष धम्पाल थोरात शहर अध्यक्ष मुखिद पठाण जिल्हा उपाध्यक्ष महंमद साबेर,



