लाईन ब्लॉक मूळे औरंगाबाद – गुंटूर – औरंगाबाद एक्सप्रेस अंशतः रद्द,

नांदेड रेल्वे विभागातील औरंगाबाद आणि जालना दरम्यान बी. सी. एम. मशीन ने रेल्वे पटरी ची देखरेख – दुरुस्ती करण्याकरिता दिनांक 31 मे 2025 ते, 20 सप्टेंबर 2025 दरम्यान 03 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे औरंगाबाद – गुंटूर – औरंगाबाद एक्सप्रेस काही दिवस अंशतः रद्द करण्यात आली आहे. ती पुढील प्रमाणे —
अंशतः रद्द गाडी :
जालना -औरंगाबाद-जालना दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेले दिनांक
1. गाडी क्रमांक 17254 औरंगाबाद – गुंटूर एक्सप्रेस दिनांक 31 मे 2025 ते, 20 सप्टेंबर 2025 दरम्यान औरंगाबाद – जालना दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी जालना ते गुंटूर अशी धावेल. हि गाडी जालना येथून तिची नियमित वेळे सायंकाळी 17:00 वाजता सुटेल
2. गाडी क्रमांक 17253 गुंटूर – औरंगाबाद एक्सप्रेस दिनांक 30 मे 2025 ते, 19 सप्टेंबर 2025 दरम्यान दरम्यान जालना – औरंगाबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी गुंटूर ते जालना अशी धावेल



