नांदेड विभागात ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत चांगले काम

स्रोत माहितीच्या आधारे, दिनांक 27.05.2025 रोजी , रेल्वे सुरक्षा बल (RPF)/ औरंगाबाद आणि स्थानिक गुन्हे शाखा, औरंगाबाद च्या कर्मचाऱ्यांनी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर गोपनीयरीत्या पाळत ठेवली.
सुमारे 17.10 वाजता, त्यांना औरंगाबाद स्टेशन परिसरात एक संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली, त्या दरम्यान त्याने टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखा, औरंगाबाद येथे नेण्यात आले.
चौकशीनंतर, त्याने त्याची ओळख शेख शकील शेख आरिफ उर्फ शकील सुरमा, वय 31 वर्षीय, एकनाथ नगर, राजनगाव, वाळूज, औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे कळविले. त्याच्याकडे एक अॅपल कंपनीचा आयपॅड सापडला. हा आयपॅड त्याने 27.05.2025 रोजी पुणे-नांदेड एक्सप्रेस क्रमांक 17629 मध्ये एका प्रवाशाच्या बॅगेतून सदर आयपॅड चोरल्याचे कबूल केले. आयपॅडची किंमत अंदाजे ₹80,900/- आहे.
रेल्वे सुरक्षा बल /सीआयबी आणि स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) औरंगाबादच्या पथकाने आरोपीला पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलीस (जीआरपी)/औरंगाबादकडे सोपवले. या संदर्भात, जीआरपी/औरंगाबाद येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुढील चौकशी दरम्यान, आरोपीने 24.05.2025 रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक 17063 अजंता एक्सप्रेस कोच एस-3 मध्ये रात्री 23:30 वाजता एका महिला प्रवाशाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याची कबुली दिली. जीआरपी/काचेगुडा यांनी 25.05.2025 रोजी आधीच गुन्हा दाखल केला होता. चोरीला गेलेल्या मालमत्तेत अंदाजे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र होते, ज्याची किंमत ₹62,000/- आहे. जीआरपी/औरंगाबाद यांनी आरोपीला वरील दोन्ही प्रकरणात जोडले आहे.



