प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट
सिस्टमद्वारे रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम, जागतिक पर्यावरण दिन जागरूकता कार्यक्रम-

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड रेल्वे विभागात “प्लास्टिक प्रदूषण संपवा” या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिम उत्साहात राबविली जात आहे.
या मोहिमे अंतर्गत दिनांक 27 मे, 2025 आणि 28 मे, 2025 रोजी प्रवाशांना प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट सिस्टमद्वारे नांदेड रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांन वापरानंतर प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन च्या सहाय्याने कशा प्रकारे क्रश करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकांवर पब्लिक अनाउंसमेंट सिस्टमद्वारे या विषयी वारंवार उद्घोषणा करून जनजागृती करण्यात आली.
या सोबतच भारतीय रेल्वे प्लास्टिक नसलेल्या पर्यावरणपूरक कटलरीला प्रोत्साहन देण्याकरिता प्रवाशांन प्रोत्साहित करत आहे. रेल्वे स्थानकांवरील टी स्टोल आणि कॅन्टीन मध्ये प्लास्टिक च्या ग्लास आणि प्लेट ऐवजी प्लास्टिक विरहित पर्यावरणपूरक कटलरीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. इंडिअन रेल्वे केटरिंग आणि टूरीजम कोर्पोरेशन (आयआरसीटीसी) बायोडिग्रेडेबल किंवा प्लास्टिक नसलेल्या कटलरीच्या वापरासाठी मोहीम लवकरच सुरू करणार आहे
प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी कर्मचारी जागरूकता कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवित आहेत.
या कार्यक्रमास श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांचे मुख्य मार्गदर्शन लाभत आहे.
ही मोहीम प्रवाशांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते.
या मोहिमे अंतर्गत दिनांक 22 मे ते 05 जून दरम्यान नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
चला, स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी एकत्र येऊया!



